पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

काश्मिरी पंडित राजाचे नाशिक कनेक्शन

काश्मिरी पंडित राजाचे नाशिक कनेक्शन! सिंधचा चंद्रसेन उपासनेसाठी विसावला पांडवलेणीत Ramesh.padwal@timesgroup.com Tweet : @MTramesh नाशिक : नाशिकचं वैभव असलेल्या त्रिरश्मी डोंगरावरील पांडवलेणी या बौद्ध लेणीचं आकर्षण जगभरातील अनेकांना राहिलं आहे. मग तो चिनी प्रवासी हू-एन-त्संग असो वा, सातव्या शतकातील सिंधचा राजा काश्मिरी पंडित चंद्रसेन. चंद्रसेन हा काश्मिरी पंडित असला तरी बौद्ध धर्माचा उपासक होता अन् उपासनेसाठी तो नाशिकच्या या लेणींमध्ये विसावला, असा उल्लेख ‘चचनामा’ या अरबी पुस्तकातून समोर आला आहे. ‘चचनामा’ या अरबीतील ग्रंथाचे फारशीमध्ये अनुवाद अरब प्रवासी अली बिन हामिद अबु बकर कोफी यांनी १२१६ मध्ये केला. या ग्रंथाला ‘फतेहनामा’ या नावानेही ओळखले जाते. त्यानंतर अनेकांनी यावर इंग्रजीत लेखन केले. सिंधियाना एनसायक्लोपिडीयानुसार, शेकडो वर्षांपूर्वी अनेक काश्मिरी पंडित काश्मीर सोडून सिंध प्रांतात विसावले. यांनी तेथे आपला राजकीय प्रभाव वाढविला आणि येथील १८४ वर्षे जुन्या राय घराण्याची सत्ता संपवली व सिंध प्रातांत प्रथमच काश्मिरी पंडित घराण्याचा उदय झाला. या घराण्याचे पहिले राजा

भारतरत्न विश्वेश्वरय्यांची मुहूर्तमेढ नाशिकमधून!

१५ सप्टेंबर अभियंता दिन विशेष भारतरत्न विश्वेश्वरय्यांची मुहूर्तमेढ नाशिकमधून! धुळ्यातील पांझरा-दातर्ती पाटबंधारा व नाशिक शहराच्या पाणीपुरवठा योजनेला दिला आकार Ramesh.padwal@timesgroup.com @MTRamesh नाशिक : द्रष्टे अभियंता म्हणून नावलौकिक मिळविलेले भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचं अन् नाशिकचं एक अतूट नातं आहे. विश्वेश्वरय्या यांच्या अभियंता क्षेत्रातील कारर्किदीची मुहूर्तमेढ १८८४ मध्ये नाशिकमधून रोवली गेली होती. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी अभियंता म्हणून त्यांची पहिलीच नेमणूक नाशिकमध्ये झाली होती. या कारर्किदीत त्यांनी वेळे आधीच धुळ्यातील प्रकल्प पूर्ण केला होता तर १९०७ मध्ये नाशिक जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता म्हणून नियुक्तीवर असताना नाशिक शहराच्या पहिल्या पाणी पुरवठा योजनेचा आराखडा त्यांनीच साकारला होता. मुंबई इलाख्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात सहायक अभियंता म्हणून नियुक्त होताच सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्यांना (जन्म १५ सप्टेंबर १८६१ – मृत्यू १४ एप्रिल १९६२) इंग्रजांनी १८८४ मध्ये नाशिक जिल्ह्याचे सह अभियंता म्हणून नियुक्त केले. रूजू होताच १८८४ सालच्या पावसाळ्यात यांच्या

तिची डेझर्ट सफारी...

तिची डेझर्ट सफारी... २०२० मध्ये ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान अबू धाबी येथे सहावा वूमन हेरिटेज वॉक होत आहे. या हेरिटेज वॉकचे वैशिष्ट्य म्हणजे तो फक्त महिलांसाठी असतो आणि तोही चक्क अमिरातच्या तळपत्या वाळवंटात. महिलांमधील क्षमतांना वेगळा आयाम निर्माण करणारा वॉक सबलीकरण आणि वैचारिक सीमोल्लंघनाची संधीच जगभरातील महिलांसाठी ठरते आहे. अबू धाबी ते अल ऐन या दरम्यानच्या वाळवंटातून चालत महिला १२५ किलोमीटरचा अंतर केवळ ५ दिवसात पूर्ण करतात. या रोमांचकारी डेझर्ट सफरी विषयी...… रमेश पडवळ, नाशिक Rameshpadwal@gmail.com 8380098107 सात एमिरात म्हणजे अबू धाबी, दुबई, शारजाह, अजमान, उम-अल-क्वैन, रास अल-खैमा, फुजैराह. या प्रदेशाची बहुतांशी जमीन ही वाळवंट आहे; परंतु त्यातही प्रत्येक प्रांतातील रेतीमध्ये विविधता आणि विकास ही ‘युएई’ (United Arab Emirates) ची खासियतच म्हणावी लागते. कारण येथील वाळवंट सहनशक्तीचीही कसोटी पाहतात, असे म्हटले जाते. येथील वाळवंटाचे रंग आणि प्रकार जसे बदलतात तसा हवेचा प्रभाव आणि उष्णतेचे प्रमाणही कमी अधिक होताना जाणवते. या वाळवंटात आपल्याला सोडून दिलं तर आपण काय करणार आहोत, नजर जा

आलिजा बहाद्दूर भुलले पख्याल्याला

आलिजा बहाद्दूर भुलले पख्याल्याला                                                                                  जिवाभावाची मैत्री : महादजी शिंदे अन् राणेखानभाई   इतिहासाच्या पानांमध्ये कर्तव्य, कर्तृत्व, जय-पराजय, शौर्य, सूड आणि आत्मशोधासाठी सुरू असलेल्या लढाय्यांमध्ये मैत्रीचे अनेक धागे अलगद गुंफलेले अन् एकमेकांमध्ये गुंतलेले पहायला मिळतात. एकमेकांच्या जीवावर उठलेले मैत्रीच्या धारेत एकजीव होतात. तर, मैत्रीसाठी आयुष्य वाहणारे जीव मोरपंखासारखे अलगद बहुरंगी होत इतिहास घडवताना दिसतात. असचं एक जात, धर्माच्या पलीकडच्या मैत्रीच ऐतिहासीक उदाहरण म्हणजे मराठा सरदार महादजी शिंदे आणि पाणी वाहणार्या राणेखानचं…   रमेश पडवळ Ramesh.padwal@timesgroup.com   कुरुक्षेत्रातील अर्जुन-श्रीकृष्णाच नातं असो वा रामायणातील राम-हनुमानाचं. मैत्रीच्या या अजरामर कथा आविष्कार घडविताना दिसतात. इतिहासाच्या पानांमध्येही अशा अनेक मैत्रीचे धागे दडलेले आहेत. यातील एक आहे मराठा सरदार महादजी शिंदे आणि पखाली (पाणी वाहणारा) असलेल्या राणेखान यांच्या मैत्रीचं. मराठा सरदार व अलिजा बहाद्दूर म्हणून ओळखले जाणारे महादजी शिंदे यांच

गुलशन-ए-इश्क

गुलशन-ए-इश्क  शीख साम्राज्याचे शेर-ए-पंजाब रणजीतसिंहांची राणी जिंद कौर पतीच्या निधनानंतर शीख साम्राज्य सावरण्याचा प्रयत्न करते. मात्र, सत्तेसाठी हपापलेले ब्रिटिश तिची तिच्या मुलापासून अन् साम्राज्यापासून ताटातूट करतात. एकीकडे व्हिक्टोरिया तिच्या मुलाचा सांभाळ करत असते, तर दुसरीकडे साम्राज्य आणि मुलं गमावल्याची दु:खाने जिंद नेपाळमध्ये एकांतवासात असते. शीख साम्राज्य, नेपाळ, लंडन, नाशिक आणि पुन्हा लाहोर असा जिंदच्या अनोखा प्रेमाचा प्रवास म्हणजे गुलशन-ए-इश्कचं म्हणावा… रमेश पडवळ ramesh.padwal@timesgroup.com दोन हजार वर्षांपूर्वी मोहाच्या फुलांनी गोदाकाठ दरवळून जायचा. ती फुलं पाण्यात टपटपायची तेव्हा प्रेमाचा संदेश घेऊन पुढच्या गावापर्यंत हा दरवळ बहरायचा अन् प्रत्येक थेंबा थेंबानं अंग शहारायचं! तेव्हा गालिब असते तर किती सुंदर लिहिलं असतं, असं वाटण्यापूर्वी दोन हजार वर्षांपूर्वीचा हाल नावाचा राजा तेव्हाचा एक गालिब म्हणावं इतका अनोखा कवी, गोदाकाठच्या मोहाच्या फुलांविषयी तेवढंच सुंदर वर्णन सप्तशती ग्रंथात नोंदवितो. अशा या नाशिकनं कवी कालिदासांनाही भुरळ घातली होती. एवढंच काय तर वनवासाला पंचवटीत

गुरू नानकांची अयोध्येनंतर महाराष्ट्रवारी

गुरू नानकांची अयोध्येनंतर महाराष्ट्रवारी! श्रीरामाशी निगडीत नाशिकसह महाराष्ट्रातील अनेक स्थळांना दिली होती भेट ramesh.padwal@timesgroup.com @rameshpadwalMT / 8380098107 नाशिक : शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांनी १५११ मध्ये रामजन्मभूमीला भेट दिल्यानंतर महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती, हिंगोली, नांदेड, पंढरपूर, रत्नागिरी, मुंबर्इ या ठिकाणांना १५१३ मध्ये भेटी दिल्या होत्या. आज गुरूनानक जयंतीनिमित्त व नुकत्याच लागलेला आयोध्या निकालामुळे हा ऐतिहासिक संदर्भ नाशिकसाठीही महत्त्वपूर्ण ठरतो आहे. सर्वोच्च न्यायालयाने आयोध्येतील राम जन्मभूमी वादावर निकाल देताना अनेक पुराण कथांबरोबर शीख ग्रंथांचा आधारही दिला आहे. गुरू नानक यांच्या जन्मसाखी (गुरू नानक चरित्र) ग्रंथानुसार त्यांनी १५११ मध्ये राम जन्मभूमीची यात्रा करीत मंदिरात रामाचे दर्शन घेतले होते. त्यावरून मुघल सम्राट बाबर याने १५२८ मध्ये बाबरी मशीद बांधली त्यापूर्वी आयोध्येत राम मंदिर अस्तित्वात होते हे सिद्ध झाले. जन्मसाखी बरोबरच वाल्मिकि रामायण आणि स्कंद पुराणाचाही आधार निकालासाठी घेण्यात आला आहे. हा संदर्भ अयोध्येपुरता जरी असला तर

लोकदैवतांच्या शोधासाठी ४० हजार किलोमीटरचा प्रवास

लोकदैवतांच्या शोधासाठी ४० हजार किलोमीटरचा प्रवास जैवशास्त्राच्या प्राध्यापक जी. डी. म्हस्के यांच्या संशोधनातून साकारला बिरदेव-म्हाळोबावर ग्रंथ ramesh.padwal@timesgroup.com tweet : MTrameshpadwal नाशिक : लोकदेवता या ग्रामसंस्कृतीचा एक भाग आहेत. मात्र, या ग्रामदेवता कोठून आल्या, त्यांची उगमस्थाने कोणती, त्यांचा व भगवान महादेव यांचा काय संबंध, या देवता संन्याशी असतील की संसारी अशा अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी आरवायके कॉलेजचे बायोटेक विभागाचे प्रमुख प्रा. जी. डी. म्हस्के यांनी पाच राज्यांतून ४० हजार किलोमीटरचा प्रवास करून २४ वर्षे अभ्यास करून ‘लोकदेवता श्री बिरदेव-म्हाळोबा’हा ५९० पानांचा ग्रंथ साकारला आहे. या लोकदैवतांशी संबंधित ६०० देवस्थानांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. जैवशास्त्राच्या प्राध्यापकाने इतिहास संशोधन क्षेत्रात दिलेले हे योगदान अनेक अभ्यासकांनी गौरविले आहे. प्रा. म्हस्के यांचे दोडी बु.(ता. सिन्नर) हे गाव. या गावाचे बिरदेव–म्हाळोबा हे लोकदैवत आहे. ग्रामदेवता, लोकदेवता महाराष्ट्राच्या ग्रामसंस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. पण, त्या आल्या कोठून, आपण त्यांची पूजा का करतो, त्यांची रुप

अहिल्यादेवी होळकर स्मारकाची उपेक्षाच!

अहिल्यादेवी होळकर स्मारकाची उपेक्षाच! पाच वर्षांपासून विधानसभेत अडकला प्रश्न; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे नजरा ramesh.padwal@timesgroup.com MTramehpadwal नाशिक : अहिल्यादेवी होळकरांची कर्मभूमी असलेल्या चांदवडमध्ये या राजमातेचे स्मारक व्हावे, ही नाशिककरांची पाच वर्षांपासूनची मागणी अजूनही विधानसभेत घुटमळते आहे. नाशिकला दत्तक घेतलेल्या माजी मुख्यमंत्र्यांनी विषय मार्गी लावायचा सोडून कागदी घोडे नाचवित स्मारकाची बोळवणच केली. भाजप-शिवसेना युतीच्या काळात विधानसभेत अडकलेला अहिल्यादेवी स्मारकाचा प्रश्न महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोडवतील का? की, या राजमातेची पुन्हा उपेक्षाच होणार, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. नाशिकचा इतिहास अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. धैर्य आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या अहिल्यादेवींचे स्मारक चांदवड येथील रंगमहालात व्हावे, अशी अपेक्षा नाशिककरांनी २० जून २०१५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. मात्र, त्याची दखलही तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही. म्हणून भाजपच्या आमदार सीमा हिरे

बंधुभावाचं ‘मूर्ति’मंत प्रतीक

http://Ancientnashik.blogspot.in/ बंधुभावाचं ‘मूर्ति’मंत प्रतीक … रमेश पडवळ Rameshpadwal@gmail.com … वैश्विक बंधुभावाची संकल्पना रुजवण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील मांगीतुंगी पर्वतावर जैनांचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांची अखंड पाषाणातील जगातील सर्वात उंच मूर्ती साकारण्यात आली आहे. १८ फेब्रुवारीला तिचा महामस्तिकाभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. यानिमित्ताने ही मूर्ती कसी साकारत गेली, त्याचा घेतलेला वेध… … मनुष्य हा सतत झेपावणारी स्वप्नं पाहणारा आहे, ज्याला स्वत:च्या उंचीपेक्षा मोठे काही तरी करून दाखविण्याची जिद्द असते. आपल्या डोळ्यासमोर अशी प्रतिमा हवी असते, की जी पाहिल्यावर लाखोंच्या जनसमुदायाला प्रेरणा मिळेल. अशा प्रतिमेला धर्माची, जातीची चौकट नसते म्हणूनच ती कुणाचाही अंर्तबाह्य कब्जा घेते. अशी भव्य प्रतिमा-शिल्प पाहताना ना धर्म आठवतो, ना जात, ना वंश! तिचा भव्याकारच मनाचा ठाव घेतो! म्हणूनच जगभरात सर्वाधिक उंच असलेल्या, अमेरिकेतील स्वातंत्र्य देवतेची स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ३०५ फूट (९३ मीटर, वजन २२५), नेपाळमधील ४५ मीटर (१४३ फूट) कैलासनाथ महादेवाची मूर्ती, बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील १०५

राज्य संग्रहालयातून मांडणार वैभवशाली ‘महा’संस्कृती

राज्य संग्रहालयातून मांडणार वैभवशाली ‘महा’संस्कृती ramesh.padwal@timesgroup.com MTrameshpadwal / 8380098107 नाशिक : देशभरात पाचशेहून अधिक संग्रहालये आहेत. यात गोवा, आसाम, गुवाहाटी, बिहारसारख्या राज्यांची संस्कृती दाखविणारी राज्य संग्रहालये आतापर्यंत दिमाखात उभी राहिली आहेत. मात्र, महाराष्ट्राच्या स्थापनेला साठ वर्षे उलटूनही राज्याचे स्वतंत्र असे राज्य संग्रहालय नव्हते. आता मात्र राज्याचे स्वत:चे संग्रहालय मुंबईत उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबतचा प्रस्ताव सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सादर केला आहे. महाराष्ट्राच्या ‘महा’संस्कृतीची मांडणी करतानाच, राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या शक्तिस्थळांसह अश्मयुगापासून ते आधुनिक महाराष्ट्राचा प्रवास शिल्पांसह दृकश्राव्य माध्यमातून मांडला जाणार आहे. पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, इतिहास-संस्कृतीबरोबर समाजकारण, राजकारण, कलासंस्कृती समजून घेण्यासाठी संग्रहालये मार्गदर्शक ठरतात. त्यामुळेच महाराष्ट्रात विविध विषयांवरील दोनशेहून अधिक शासकीय तसेच खासगी संग्रहालये आहेत. मुंबर्इतील छत्रपती शिवाजी