पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

काश्मिरी पंडित राजाचे नाशिक कनेक्शन!

काश्मिरी पंडित राजाचे नाशिक कनेक्शन! सिंधच्या चंद्रसेन उपासनेसाठी विसावला पांडवलेणीत Ramesh.padwal@timesgroup.com Tweet : @MTramesh नाशिक : नाशिकचं वैभव असलेल्या त्रिरश्मी डोंगरावरील पांडवलेणी या बौद्ध लेणीचं आकर्षण जगभरातील अनेकांना राहिलं आहे. मग तो चिनी प्रवासी हू-एन-त्संग असो वा, सातव्या शतकातील सिंधचा राजा काश्मिरी पंडित चंद्रसेन. चंद्रसेन हा काश्मिरी पंडित असला तरी बौद्ध धर्माचा उपासक होता अन् उपासनेसाठी तो नाशिकच्या या लेणींमध्ये विसावला, असा उल्लेख ‘चचनामा’ या अरबी पुस्तकातून समोर आला आहे. ‘चचनामा’ या अरबीतील ग्रंथाचे फारशीमध्ये अनुवाद अरब प्रवासी अली बिन हामिद अबु बकर कोफी यांनी १२१६ मध्ये केला. या ग्रंथाला ‘फतेहनामा’ या नावानेही ओळखले जाते. त्यानंतर अनेकांनी यावर इंग्रजीत लेखन केले. सिंधियाना एनसायक्लोपिडीयानुसार, शेकडो वर्षांपूर्वी अनेक काश्मिरी पंडित काश्मीर सोडून सिंध प्रांतात विसावले. यांनी तेथे आपला राजकीय प्रभाव वाढविला आणि येथील १८४ वर्षे जुन्या राय घराण्याची सत्ता संपवली व सिंध प्रातांत प्रथमच काश्मिरी पंडित घराण्याचा उदय झाला. या घराण्याचे पहिले राजा चच. पश्चिमेकडील

ज्ञानाच्या उपासनेसाठी : बोधसूत्र

इमेज
ज्ञानाच्या उपासनेसाठी : बोधसूत्र ब्लॉग लिहिणं सोपं नाही. नवनवीन विषय घेऊन नव्या युगातील वाचकांना वाचनाची गोडी लावणं अधिक आव्हानात्मक होत आहे. त्यात महिला ब्लॉगरची संख्या पुरूष ब्लॉगरच्या तुलनेत कमी असली तरी विषयांतील वैविध्य मात्र महिलांनी जाणीवपूर्वक जपलं आहे. अगदी फॅशनपासून लाइफस्टाइलपर्यंत, ट्रॅव्हलिंगपासून फूडपर्यंतच्या विषयांना त्यांनी न्याय दिला आहे. या नव्याने ब्लॉगर म्हणून ओळख कमावलेल्या पुण्यातील धनलक्ष्मी टिळे यांनी जिज्ञासेतून भारतीय संस्कृती, इतिहास, पुरातत्त्व क्षेत्रातील वेगवेगळ्या पैलूंवर बोधसूत्रातून टाकलेला प्रकाश एक वेगळा प्रयत्न ठरतो आहे. रमेश पडवळ धनलक्ष्मी टिळे! वय ३२. त्या गेल्या सात वर्षांपासून पुण्यात ‘बालकला’ या कला प्रशिक्षण संस्थेअंतर्गत लहान मुलांना चित्रकला हा विषय शिकवतात. कला आणि नाट्यसृष्टीचे बाळकडू त्यांना घरातूनच म्हणजे बाबा सिनेअभिनेते प्रकाश इनामदार आणि आई जयमाला इनामदार यांच्याकडून मिळाले. त्यांनी काही वर्षं रंगभूमीत काम केलं. लहान बाळाची नाळ जशी त्याच्या आईशी जोडलेली असते, तशीच ती आपल्याला जन्मापूर्वीपासून मिळणाऱ्या संस्कारा

गुरू नानकांची अयोध्येनंतर महाराष्ट्रवारी!

इमेज
गुरू नानकांची अयोध्येनंतर महाराष्ट्रवारी! श्रीरामाशी निगडीत नाशिकसह महाराष्ट्रातील अनेक स्थळांना दिली होती भेट ramesh.padwal@timesgroup.com @rameshpadwalMT / 8380098107 नाशिक : शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांनी १५११ मध्ये रामजन्मभूमीला भेट दिल्यानंतर महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती, हिंगोली, नांदेड, पंढरपूर, रत्नागिरी, मुंबर्इ या ठिकाणांना १५१३ मध्ये भेटी दिल्या होत्या. आज गुरूनानक जयंतीनिमित्त व नुकत्याच लागलेला आयोध्या निकालामुळे हा ऐतिहासिक संदर्भ नाशिकसाठीही महत्त्वपूर्ण ठरतो आहे. सर्वोच्च न्यायालयाने आयोध्येतील राम जन्मभूमी वादावर निकाल देताना अनेक पुराण कथांबरोबर शीख ग्रंथांचा आधारही दिला आहे. गुरू नानक यांच्या जन्मसाखी (गुरू नानक चरित्र) ग्रंथानुसार त्यांनी १५११ मध्ये राम जन्मभूमीची यात्रा करीत मंदिरात रामाचे दर्शन घेतले होते. त्यावरून मुघल सम्राट बाबर याने १५२८ मध्ये बाबरी मशीद बांधली त्यापूर्वी आयोध्येत राम मंदिर अस्तित्वात होते हे सिद्ध झाले. जन्मसाखी बरोबरच वाल्मिकि रामायण आणि स्कंद पुराणाचाही आधार निकालासाठी घेण्यात आला आहे. हा संदर्भ अयोध्येपुरता

गुलशन-ए-इश्क नासिक

इमेज
गुलशन-ए-इश्क  शीख साम्राज्याचे शेर-ए-पंजाब रणजीतसिंहांची राणी जिंद कौर पतीच्या निधनानंतर शीख साम्राज्य सावरण्याचा प्रयत्न करते. मात्र, सत्तेसाठी हपापलेले ब्रिटिश तिची तिच्या मुलापासून अन् साम्राज्यापासून ताटातूट करतात. एकीकडे व्हिक्टोरिया तिच्या मुलाचा सांभाळ करत असते, तर दुसरीकडे साम्राज्य आणि मुलं गमावल्याची दु:खाने जिंद नेपाळमध्ये एकांतवासात असते. शीख साम्राज्य, नेपाळ, लंडन, नाशिक आणि पुन्हा लाहोर असा जिंदच्या अनोखा प्रेमाचा प्रवास म्हणजे गुलशन-ए-इश्कचं म्हणावा… रमेश पडवळ ramesh.padwal@timesgroup.com दोन हजार वर्षांपूर्वी मोहाच्या फुलांनी गोदाकाठ दरवळून जायचा. ती फुलं पाण्यात टपटपायची तेव्हा प्रेमाचा संदेश घेऊन पुढच्या गावापर्यंत हा दरवळ बहरायचा अन् प्रत्येक थेंबा थेंबानं अंग शहारायचं! तेव्हा गालिब असते तर किती सुंदर लिहिलं असतं, असं वाटण्यापूर्वी दोन हजार वर्षांपूर्वीचा हाल नावाचा राजा तेव्हाचा एक गालिब म्हणावं इतका अनोखा कवी, गोदाकाठच्या मोहाच्या फुलांविषयी तेवढंच सुंदर वर्णन सप्तशती ग्रंथात नोंदवितो. अशा या नाशिकनं कवी क