पोस्ट्स

मार्च, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नासिक कर्फ्यू डायरी : दिवस पहिला : गुढीपाडवा... अन् युद्धाचा दिवस!

नासिक कर्फ्यू डायरी : दिवस पहिला गुढीपाडवा... अन् युद्धाचा दिवस! स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आम्ही आतापर्यंत असंख्य युद्ध लढली आहेत. नासिकच्या इतिहासात दोन हजार वर्षांपूर्वी लढलेल्या एका युद्धाचा आजच्या सणाशी आणि आज आपण लढत असलेल्या लढ्याशी एक अनोखा संबंध आहे. आजचा गुढीपाडवा कायम स्मरणात राहिलं, अशी लढार्इ आपण लढत आहोत, आपलं शहर लढत आहे आपला देश लढत आहे, आपलं जग लढत आहे. आपण यापूर्वीच्या लढाया कधी हरलो नाहीत. मात्र, फितूरी होणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. काय संबंध आहे गुढीपाडव्याचा आणि नासिकच्या त्या लढार्इचा.. ‘नासिक कर्फ्यू डायरी’त कर्फ्यूच्या पहिल्या दिवसाची कहाणी! ---- काय योगायोग आहे ना? मराठी माणसासाठी हा नववर्षाचा पहिला दिवस. नवीन काही संकल्प करण्याचा आणि तो तडीस घेऊन जाण्यासाठी निश्चय करण्याचा हा दिवस. या दिवसापासून आपल्याला आपल्या जीवावर बेतलेल्या करोना व्हायरस विरोधात युद्धात उतरावं लागत आहे. हे युद्ध रणांगणात नाही तर घराच्या चार भिंतीत राहून आपल्याला लढायचंय. हेही या युद्धाचं वेगळंपण. आणखी एक वेगळपण म्हणजे या युद्धासाठी तलवारी, भाले, मशीनगन, बाँम्ब, एके४७ वगैरे नको

नासिक कर्फ्यू डायरी

नासिक कर्फ्यू डायरी         कर्फ्यू म्हटलं की, जबरदस्तीनं घरात राहण्याची सक्ती... रस्त्यावर आलात तर गोळ्या घालण्याची भीती. एखाद्या सरकारची दहशत, कोणाला तरी काही तरी मिळवायचयं म्हणून आवाज दाबण्याची प्रशासन व्यवस्थेला हाती घेऊन गेलेली प्रक्रिया. मात्र, एखाद्या आजारी पाडणार्या व्हायरसमुळे जगावर स्वत:हून कर्फ्यू ओढवून घेण्याचं संकट ओढवेल, असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. इंग्रजी चित्रपटांमध्ये मात्र, हे चित्र अनेकदा चितारलं गेलं आहे. टाइमपास म्हणून हा चित्रपट पाहतानाही कधी तरी ‘करोना’ नावाचा व्हायरसमुळे असं संकंट जगावर ओढवेल, असं कधी वाटलं नव्हतं. जे आपण आज प्रत्यक्षात अनुभवतो आहे. जनता कर्फ्यूच्या एका दिवसानं आपल्याला इतकं भेदरवून टाकलं की, आपण सायंकाळी व्हायरस गेला, अशी भाबडी आशा बाळगत रस्त्यावर आलो. खरंतर, कोंडून घेण्याची, राहण्याची आपली संस्कृती नाहीच. एखादं पुस्तक संपवायचंय म्हणून आठवडाभर लायब्ररीत अथवा घरात कोंडूंन घेणं वेगळं अन् रस्त्यावर आलात, लोकांना भेटलात, हात मिळविला, जवळून बोललात तर आजारी पडून मृत्यूपर्यंत आपला प्रवास होऊ शकतो, ही भीती वेगळी. भीतीनं कोंडून घेणं म्हणजे एक म