पोस्ट्स

मार्च, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गोदावरीला हवी लोकायुक्तांची मात्रा!

गोदावरीला हवी लोकायुक्तांची मात्रा! रमेशायण / 8380098107 गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे अगदी नाशिक नगरपालिका व महापालिकेच्या स्थापनेपूर्वीपासून तसेच पेशवाईतही नाशिकचा स्वाभिमान, अभिमान असलेल्या गोदावरीच्या प्रदूषणासाठी झटते आहे. मात्र गोदावरीची परिस्थिती काही काही केल्या बदललेली दिसत नाही. उलटपक्षी महापालिकेच्या अज्ञानामुळे गेल्या काही वर्षात गोदेची परिस्थिती किती भयंकर झाली आहे हे आता गोदा अभ्यासकांमुळे उघड व्हायला लागले आहे. नियमांची सोईस्करपणे होणारी मोडतोड, राजकिय नेतृत्वाचा अभाव, लोकप्रतिनिधींची उदासिनता, गोदेच्या स्वच्छतेबाबत व प्रदूषणाबाबतच्या माहितीचे अज्ञान, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचा ना करतेपणा अन् हे सगळं घडत असताना तोंडावर बोट ठेऊन शांत बसलेला नाशिककर यामुळे गोदेची अवस्था दयनीय म्हणण्यापलीकडे गेली आहे. नेमकं काय केलं म्हणजे गोदेला श्वास घेता येईल. गोदावरी नदीच्या रक्षणासाठी स्वतंत्र लोकायुक्त नेमला तर गोदेची परिस्थिती बदलली जावू शकेल, असे आता वाटायला लागले आहे. महापालिकेच्या दीडशतकी कारर्कीदीत गोदावरीच्या स्वच्छतेसाठी अन् संवर्धनासाठी आतापर्यंत कोट्यवधींचा खर्च झाला असणा

गुढीपाडवा आणि सातवाहनांचं सातपूर

गुढीपाडवा आणि सातवाहनांचं सातपूर अनेकदा प्राचीन संस्कृतीचं अधिष्ठान लाभलेल्या गावात प्रगतीच्या वेगामुळे ‘त्या’ संस्कृतीच्या खाणाखुणा मिळत नाहीत. मात्र गाव ते उपनगर हा प्रवास केलेल्या सातपूरने आपल्या नावातून तो प्राचीन इतिहास अजूनही जपला आहे. सातवाहनांचे अधिष्ठान असलेले सातपूर अजूनही गुढीपाडव्यातून दोन हजार वर्षांपूर्वीच्या पराक्रमाच्या इतिहासाची साक्ष देताना दिसते. रमेश पडवळ Rameshpadwal@gmail.com 8380098107 सम्राट चंद्रगुप्त मौर्याची कारकीर्द हा भारतीय इतिहासातला एक सुवर्णकाळ समजला जातो. चंद्रगुप्ताच्या आधिपत्याखाली असलेल्या एकूण प्रदेशापैकी दख्खनही (आताचा महाराष्ट्र) एक होता. त्यानंतर सुरू झालेला सातवाहन कालखंड महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा आरंभ ठरला. सातवाहनांचा साम्राज्य विस्तार गोदाखोऱ्यात व्यापलेला होता. म्हणून त्यांच्या राजवटीस गोदासंस्कृती म्हटले गेले. सातवाहनकालीन महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमा अतिशय व्यापक होत्या. गौतमीपुत्र सातकर्णीचे वडील शिवस्वातींकडे तेव्हाच्या महाराष्ट्राचा कारभार होता अन्‌ त्यांची वसाहत गोवर्धन येथे होती. म्हणजे आताचे गंगापूर-गोवर्धन गाव. उत्तरे

लकडी की काठी, काठी का घोडा!

इमेज
लकडी की काठी, काठी का घोडा! आकर्षण हा शब्द जरा भलताच वाटत असला तरी त्या आकर्षणात खूप काही दडलेलं असतं. प्रत्येकाच आकर्षण वेगळं असून शकतं. त्या आकर्षणाला कसलही वय नसतं असतात ती फक्त स्वप्न. घोड्यासारखं उधळलेली… पांढरी शुभ्र… अन् वेगवान! हे उधळणं मनाचा ठाव घेतं… मनाला वेगवेगळ्या अंशांमध्ये फिरवतं… कधी ते वजनकाट्यावर त्याचं वजन मोजण्यासाठी नेतं तर कधी खोल पाण्यामध्ये समुद्राचा तळ पाहण्यासाठी… मनातील ते आकर्षण एखाद्या घोडासारखं रूबाबदार झालेलं असतं. घोडा ही उमपा मनाला देताना मन कधी बालपणात जातं तर कधी चेतक नावाच्या इतिहासात… कोण आहे हा घोडा? कोठून आला? कुठे कुठे हा भेटत राहतो आपल्याला? का भेटतो? असे अनेक प्रश्न मनाचा पिंगा घेतात. आपल्या अख्यायिकांशी अन् संस्कृतीशी जोडल्या गेलेल्या घोडा या प्राण्याच्या विश्वात डोकावताना… रमेशायणही हरखून जातो.. वाचा   रमेशायण ‘लकड़ी की काठी काठी पे घोड़ा घोड़े की दुम पे जो मारा हथौड़ा दौड़ा दौड़ा दौड़ा घोड़ा दुम उठा के दौड़ा,’ हे गाणं आवडलं नाही, असं म्हणणारा कोणी सापडणार नाही. 1960 च्या दशकातील आर. डी. बर्मन यांनी गायलेलं हे गाण आहे मास