पोस्ट्स

जून, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नाशिक हेरिटेज जतनासाठी नागरी समिती !

इमेज
नाशिक हेरिटेज जतनासाठी नागरी समिती ! नाशिक जिल्ह्यात अनेक वारसा स्थळे आहेत. ही वारसा स्थळे जपण्याच्या तसेच दुर्लक्षित वारसा स्थळांच्या संरक्षणासाठी जनजागृती व प्रयत्न होण्याची गरज आहे. खरे तर जिल्हा पातळीवर तसेच प्रत्येक ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका व महापालिकेच्या पातळीवर वारसा जतन समितीची गरज आहे. हे बहुदा कायद्यातही असावे; मात्र याची अंमलबजावणी होत नसल्याने नाशिकमधील अनेक वारसा स्थळे दुर्लक्षित व दयनीय स्थितीत आहेत. अनेक मंदिरे, गड-किल्ले, शिल्प, शिलालेख, ताम्रपट, वाडे, गढ्या अन् प्राचीन इतिहास दुर्लक्षित राहिल्याचे आपण पाहतोच आहोत. प्रशासनाकडे याबाबत कोणत्याही स्वरूपाचा पाठपुरावा होत नसल्याने नाशिकचा वारसा अधिकच धोक्यात जाण्याची शक्यता आहे. याचे आणखी एक कारण म्हणजे हा वारसा आहे, हे न समजल्यामुळे तो अधिक धोक्यात आल्याचे दिसते. तर एखादे शिल्प अथवा स्थळ वारसा असल्याचे माहित असून, आपण पुरातत्त्व अथवा संबंधित खात्यापर्यंत पत्रव्यवहार करण्यास धजत नाही. कारण, या उचापत्या कोण करणार आणि त्याला प्रशासन प्रतिसाद देर्इल का? हा एक अतिप्राचीन प्रश्न नेहमी आपल्या डोक्यात घट्ट

दगड शिकवा आम्हा आता कोणी…!

इमेज
दगड शिकवा आम्हा आता कोणी … ! इतिहास म्हणजे काय, आपण इतिहास का शिकतो अन् वारंवार त्यात का डोकावतो. अनेकांना इतिहास हा वेडा वाटतो. तर अनेकांना इतिहासाचं भलतचं वावडं असतं. खरं तर त्यांना इतिहास कळालेलाच नसतो केव्हा ते इतिहासातच वावरत असतात, त्यांना त्यांच्या भामटेपणा इतिहासाच्या डोळ्यात डोळे घालून जगू देत नाही म्हणून त्यांना तो टोचतो. पण, खरचं इतिहास नेमका काय आहे आणि तो जपण्यासाठी आपण प्रयत्न करतो का? मला वाटतं इतिहास म्हणजे भविष्यातील पाऊलखुणा! या पाऊलखुणा इतिहासावर आधारलेल्या किंवा इतिहासाचा हात हातात घेऊन पुढे जाणार असतात. पटो अथवा न पटो आपण इतिहासाशिवाय जगू शकतच नाही. कारण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक गोष्टीला एक इतिहास आहे. त्यातील काहींची आपण दखल घेतो तर काहींना इतिहास म्हणून सोडून देतो. जे सोडून देतो ते नेमकं काय असतं अन् आपण ते सोडून का देतो, याचा विचार आपण करत नाही अन् माहितीच्या अभावामुळे विचार करण्याची वेळच आपल्यावर येत नाही. जे काही आपण इतिहास म्हणून सोडून देतोय ते मागे वळून एकदा पहायला हवे, अशी स्थिती नाशिकच्या अन् महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये पहायला मिळते