पोस्ट्स

जुलै, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महापालिकेतला कुंभकर्ण अन् हरवलेली हेरिटेज कमिटी!

इमेज
महापालिकेतला कुंभकर्ण अन् हरवलेली हेरिटेज कमिटी! एका होता रावण.. त्याचा भाऊ कुंभकर्ण! हे काही वेगळं सांगायला नको. पण, या कुंभकर्ण महाशयांची मला नेहमी आठवण येते. ती म्हणजे एकतर आपल्यातील (नाशिककरांमधील) कुंभकर्ण जेव्हा जागा होतो तेव्हा आणि कधी समोरच्या कुंभकर्णाला सगळं दिसत असूनही झोपेचं नाटक करावं वाटतं तेव्हा… दोघेही सारखेच पण, महापालिकेतला कुंभकर्ण काही भलताच आहे. त्याला सगळं काही खायचं असतं तेही झोपेत! असं कसं होर्इल काही खाण्यासाठी जागं तर व्हावं लागेल ना? नाशिक महापालिकेची स्थितीही अशीच आहे. कुंभकर्ण व्हायचंय आणि खायचही भरपूर आहे मात्र जाग व्हायचं नाहीये. आता याला काय म्हणावं. हे समजून घेण्यासाठी मी या कुंभकर्णाला भेटायला गेलो अन् या महापालिकेत कुठे हेरिटेज कमिटीचं आफिस होतं ते कुठे गेलं असं विचार तर खेकसलाच माझ्यावर… भाऊ हेरिटेज म्हणजे काय? थेट सवाल केला अन् आता माझीच गोची झाली.. या संवादातील महाभारताविषयी.. अर्थात कुंभकर्ण हे पात्र रामायणात होतं याचा विसर कुंभकर्णालाही पडलेला दिसतो. रमेशायण : (महापालिकेच्या गेटवरच) भाऊ.. भाऊ उठा आता किती वेळचा विचारतो. पालिकेचं तर