पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आदिवासी जागा होतोय...

आदिवासी जागा होतोय... रमेशायण  'रोटी, कपडा और मकान' ही माणसाची मुलभूत गरज स्वातंत्र्यानंतरही आदिवासी समाजाच्या पदरात पडलेली नाही. १९३०मध्ये नाशिकच्या चणकापूर परिसरात आपल्या मूलभूत हक्कांच्या मागणीसाठी आदिवासींनी इंग्रजांविरूद्ध दीड दिवसांचं आंदोलन केलं. त्यात असंख्य आदिवासींना आपले प्राण गमवावे लागले. तर ८३ वर्षांनंतर 'रोटी, कपडा और मकान' या मागण्यांसाठी चणकापूरजवळ ११ व १२ एप्र‌िलला गुजरात महामार्ग दीड दिवस आंदोलन करून अडवण्यात आला. सरकारच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी आदिवासी जागा होतोय हेच खरं...  स्वातंत्र्यलढ्यात आदिवासींचे योगदान म्हणजेच कळवण तालुक्यातील चणकापूरचा अजरामर लढा. आज तो अनेकांच्या स्मरणातही नसेल. यावर कधी पुस्तक लिहिलं अथवा एखादा धडा न आल्याने म्हणा आपल्याला त्याचं विस्मरण झालं आहे. १९३०मध्ये झालेला चणकापूरचा दीड दिवसांचा लढा आज आठवायचं कारण म्हणजे कळवण तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून आदिवासींनी वनहक्क, रोजगार व महागाई या कारणांनी एल्गार पुकारलाय. त्यामुळेच आदिवासींच्या चणकापूर लढ्याची आठवण पुन्हा ताजी झाली. चणकापूरचा तो लढा आणि गुजरात महामार्ग तब्बल

नाशिकचे वाडे : ऐतिहासिक अन्‌ सांस्कृतिक संचित

इमेज
नाशिकचे वाडे : ऐतिहासिक अन्‌ सांस्कृतिक संचित --          रमेशायण https://rameshaayannashik.blogspot.com/ एखादी संस्कृती ही त्या समाजासाठी तयार झालेला आरसा असते. व्यक्तींमध्ये संस्कृती साकारते , जिवंत होते , नव्याने निर्माण होते. तरीही संस्कृती व्यक्तिनिरपेक्ष अस ते , कारण तिला एक निराळेच स्वतंत्र जीवन बहाल झालेले असते . म्हणूनच यातून अनेक संस्कृतीप्रमाणे वाडा संस्कृतीसारखी एक संस्कृती साकारते . प्रत्येकाची अन्‌ प्रत्येक शहराची एखाद्या संस्कृतीमुळे ओळख असते . ही ओळख शेकडो वर्ष त्या शहराचा चेहरा बनून बहरत्या शहराला नवचैतन्य देत राहते . पुणे म्हटलं की, शनिवारवाडा जसा डोळ्यापुढे उभा राहतो तशीच नाशिक अन्‌ येथील वाडा संस्कृतीही अशीच आहे . नाशिकच्या वाड्यांचा हा प्रवास एका झुंजावातापासून एका विवंचनेपर्यंत घेऊन जातो . ही विवंचना आहे त्या अज्ञात वाड्यांच्या इतिहासाची, ते बांधणाऱ्या हरविलेल्या माणसांची अन्‌ त्यांचा इतिहास पुसट होत चालल्याची . नाशिकमध्ये पहिला वाडा कोणता बांधला गेला हे सांगणे कठिण असले तरी गड किल्ल्यावर राजवाडे बांधणारे राजे व त्यांच्या सरदारांनी गावांमध्ये वाड्या

शिस्त, मुंढे अन रमेशायण : एक विवेचन

शिस्त, मुंढे अन रमेशायण : एक विवेचन शिस्त हा शब्द सध्या जरा जास्तच चर्चेत आहे. पण, शिस्त म्हणजे नेमकं काय? हे यानिमित्तानं पुन्हा विचार करायला लावणार आहे. कारण जर तुमच्यातील शिस्त समोरच्याला समजली नाही तर तुम्ही बेशिस्त होता. त्या बेशिस्तीला संतापी, प्रकोपी, रागीट या शब्दांमध्ये तुम्हाला बांधलं जातं अन् तुमच्या शिस्तीचं खोबर होतं. म्हणूनच आपली शिस्त म्हणजे नेमकं काय म्हणायचंय हे इतरांना समजून सांगणं गरजेच पडतं. अर्थात, जमजून सांगितलं म्हणजे पटतं असंही नाही पण, किमान आपली शिस्त बरोबर आहे हे आपल्याशी पक्क होतं. अनेकदा कामाच्या ठिकाणी, व्यवस्थापनांमध्ये, जगाच्या काळजीत अथवा आपल्या लहान मुलांना हाताळताना शिस्त हा विषय येतो. सध्या नाशिकमध्ये महापलिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यामुळे शिस्त हा शब्द अधिक चर्चेत आला आहे. खरं तर शिस्त इतरवेळी फारसी चर्चेत पहायलाही मिळत नाही. पण, अशा काही अधिकाऱ्यांमुळे ती पहायला मिळते किंवा आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात प्रसंगानरूप अनुभवत असतो. पुण्यात असताना अरुण भाटिया या आयएएस अधिकाऱ्याची शिस्त खूप जवळून पाहिली होती. त्यामुळे आपली शिस्त आपल्याशी किती पक्की