महापालिकेतला कुंभकर्ण अन् हरवलेली हेरिटेज कमिटी!


महापालिकेतला कुंभकर्ण अन् हरवलेली हेरिटेज कमिटी!


एका होता रावण.. त्याचा भाऊ कुंभकर्ण! हे काही वेगळं सांगायला नको. पण, या कुंभकर्ण महाशयांची मला नेहमी आठवण येते. ती म्हणजे एकतर आपल्यातील (नाशिककरांमधील) कुंभकर्ण जेव्हा जागा होतो तेव्हा आणि कधी समोरच्या कुंभकर्णाला सगळं दिसत असूनही झोपेचं नाटक करावं वाटतं तेव्हा… दोघेही सारखेच पण, महापालिकेतला कुंभकर्ण काही भलताच आहे. त्याला सगळं काही खायचं असतं तेही झोपेत! असं कसं होर्इल काही खाण्यासाठी जागं तर व्हावं लागेल ना? नाशिक महापालिकेची स्थितीही अशीच आहे. कुंभकर्ण व्हायचंय आणि खायचही भरपूर आहे मात्र जाग व्हायचं नाहीये. आता याला काय म्हणावं. हे समजून घेण्यासाठी मी या कुंभकर्णाला भेटायला गेलो अन् या महापालिकेत कुठे हेरिटेज कमिटीचं आफिस होतं ते कुठे गेलं असं विचार तर खेकसलाच माझ्यावर… भाऊ हेरिटेज म्हणजे काय? थेट सवाल केला अन् आता माझीच गोची झाली.. या संवादातील महाभारताविषयी.. अर्थात कुंभकर्ण हे पात्र रामायणात होतं याचा विसर कुंभकर्णालाही पडलेला दिसतो.
रमेशायण : (महापालिकेच्या गेटवरच) भाऊ.. भाऊ उठा आता किती वेळचा विचारतो. पालिकेचं तर उत्तर ना की गुत्तर नाय. बाकी जावूद्या! ही हेरिटेज कमिटी कुठे दिसते का ते सांगा..
कुंभकर्ण : हाSSSSSSSSSSSSSSSSS झोपू द्या की राव. काय सकाळी सकाळी आलात तोंड घेऊन!
रमेशायण : ऊन! आहो पावसाळ्याच्या दिवसातही कडक दुपारच ऊन पडलं आहे आणि सकाळी सकाळी ते काय?
कुंभकर्ण : हा… जावा ते कोपर् या आहे टॅक्सच आफिस..
रमेशायण : टॅक्सचं आफिस??? टॅक्सच आफिस नको हो. हेरिटेज कमिटीचं आफिस पाहिजे. टॅक्स काय आम्ही कितीही आला तरी भरूच. टॅक्स मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेऊन वाढवला काय की, ज्या पक्षाला मत दिली त्यांनी वाढविला काय? त्यांचं प्रेम हाय नाशिककरांवर. त्यांनी आपल्याला दत्तक घेतलयं त्यामुळे त्यांना नको का काही द्यायला. टॅक्सच्या प्रेमापोटी लुटणारच. स्मार्टच्या नावाखाली नाही का लुटत. गोदावरीच्या काठावर झाडे लावून लाखो लुटणार.. आणि गोदा ती झाडे पुरात वाहून नेणार.. आमच्या राज साहेबांच्या गोदापार्क नाही का तिने वाहून नेला. नियमांच्या आयचा घो.. (ही शिवी नाही असं न्यायालयाने म्हटलं आहे म्हणून वापरत आहे.) येथे आयुक्तांना कसा दिसेल. गोदाही नाशिकची हेरिटेजच आहे तिच्या ग्रीनबेल्टमध्ये कोणतेही सिमेंटचे काम करायचे नाही असेल असताना सुंदर सुंदर घाट बांधलेलच ना, सजावटीच्या नावाखाली! आता परत स्मार्टच्या नावावर काही तरी बांधतील म्हणून आधीच येऊन निषेध नोंदवावा म्हणून आलो आहे. टॅक्स किती आला तरी तो अडव्हान्स भरणारे आम्ही नाशिककरच आहोत.. निवडणूक आल्यावरच तुंबलेला सगळा टॅक्स नील करणारे नेते नव्हे! टॅक्स नव्हे हेरिटेज कमिटीचे आफिस दाखवा…  
कुंभकर्ण : काऊ नका नाशिककर.. माफी असावी. लय वर्ष झोपलो होतो ना त्यामुळे महापालिकेतील बदल लक्षात आले नाहीत. ‘नाठांच्या माथी हाना काठी’ असे म्हटणार्या आयुक्त साहेबांनी महापालिकेतील सगळ्या फायली चकाचक केल्या काही दिवसांपूर्वी पण यात हेरिटेज ‘खाते’ कुठे दिसलं नाही. ना कोणती फाइल सापडली. नाय बा आमच्या महापालिकेत अशी काही कमिटी नाही. अन् कशाल वेळ घालवताय माझा झोपायचं मला. जावा.. नाहीतर नाशिक महापालिकेच्या चत्री अपवर आपली तक्रार नोंदवा. म्हणजे पुढील काही वर्ष तुम्हाला काय उत्तर येत नाय आणि आमच्या डोक्याला ताप नाय! कसे?
रमेशायण : अरे देवा.. महापालिकेत हेरिटेज कमिटी आहे की नाही यासाठी आता अप वर तक्रार नोंदवायची. कारभार बराच सुधारलाय म्हणे.. गरिबांची घरे पाडली जात असताना शहरातील टेरीसवरील हॉटेल मात्र लय कमावतायेत, असं ऐकलं आहे.
कुंभकर्ण : अबब.. लय खरपूस बोललात राव. कालच पार्सल मागवलं होतं. लय झ्याक होतं. तुम्ही कोणत्याही मुद्द्यावर बोट ठेऊ नका. तुमच्या कामापुरतं बोला. तुमची ती काय हेरिटेज कमिटीपण झोपली हाय. अन विकासात कसला आला हेरिटेज. कामात व्यत्ययच अधिक. हेरिटेज वगैरे वगैरे काही नसतं. आमच्या पालिकेत देव पण नाहीत. सगळे काढले बाहेर.. सरळ मार्गी बाहेर. तिथे तुमची काय कसुर चला निघा.. देवासारखे.
रमेशायण : देवांना बाहेर काढलं ते बरच झालं. नियमात कुठे आहे आफिसात देव ठेवायचे पण नियमात तर टेरेस हॉटेलपण नाहीत ना? खड्ड्यात गेले तुमचे नियम आणि हॉटेल. आमच्या हेरिटेज कमिटीचं हरवलेल आफिस शोधून द्या म्हणजे झालं. अन् तु काय मोठा आयुक्त असल्यासारखा बोलतो आहेस. जे काम सांगितलं ते कर. साहेबा!
कुंभकर्ण : हा आता कसे जागेवर आलात. साहेब म्हटल्याशिवाय येथे कोणतीही कामे होत नाहीत. नाहीतर आम्ही तुमच्या फायली अनेक वर्षांसाठी कपाटात बंद करून ठेऊ शकतो. तपासपण लागणार नाय कि कोणत्या टेबलावर हाय आणि कोणत्या टेबलावर नाय! तुमचं आफिस आम्ही गुंडाळलं आणि बाडामध्ये बांधलं. आमच्या साहेबांना नाही करायचं हेरिटेज कमिटी काय करणार तुम्ही.
रमेशायण : आम्ही काय करणार. येथे रडल्याशिवाय आर्इपण दुध पाजत नाय! म्हणून रडत राहणार कधीतरी तरी दूध पाजालच ना!
कुंभकर्ण : आता तर फक्त घरपट्टी वाढवली आहे आणि पाणी पट्टीवाढवून तुमच्या तोंडच पाणी पळवायला वेळ लागणार नाही. हेरिटेज फिरिटेज काय मिळणार ना! सावरकरांचे अभिनव भारत असो वा फाळकेंचा स्टुडिओ. कुंभमेळा असो वा गोदाकाठची मंदिरे असोत वा काळाराम. आम्हाला त्याचं काय?
रमेशायण : खरं आहे बाबा! तुमचं राज्य आहे. झोपा काढा नाहीतर काहीही करा. स्मार्ट रोड पावसाळ्यात सुरू करा नाहीतर गोदाकाठावर शोभेची झाडे लावा आम्हालाच आणि आमच्याच पुढील पिढ्यांना त्याचे भोग सोसायचे आहेत. आपलं काय? आज नाशिककरांना दत्तक घेतलयं उद्या पुणेकरांना घ्या. आमच्याकडे मजबूत राजकिय नैतृत्व नसल्यामुळंच तुम्ही इतक्या उड्या मारताय हे कोणाच्या लक्षात येत नाही हे दुदैव आमचे म्हणा.
कुंभकर्ण : महापालिकेच्या प्रशासकीय कारभाराचा मी एक चेहरा आहे. मी किती वर्षांनी जागा होर्इल मला माहित नाही. शहरातील या वारसा म्हणजे तुमच्या हेरिटेजशी मला काही घेणं देणं नाही. जमलं तर बघू. आणि कामांच्या बजेटचा विचार करून त्यावर सगळी राजकीय मंडळीत बसवू. आम्ही तेच करतो सगळीकडे. तुम्हाला हेरिटेज कमिटी हवी आहे ना? देवून ठाकू की? इथलं महाभारत लय वेगळं हाय.. २००४ मध्ये हेरिटज कमिटी स्थापन करण्याचं नाटक आम्ही केलं होतं. लाखो रूपये हेरिटेजच्या सर्व्हेक्षणात खर्चही केले. लय मज्जा आली अख्खं नाशिक फिरलो. पोट भरलं खावून खावून. ५००-५०० पानांचे दोन मोठे जाड जूड अहवाल तयार केले आणि महापालिकेच्या कोणत्या तरी कोपर्यात फेकून दिले. कोणीतरी दिल्लीकडची बार्इ आली होती. तिला फी म्हणून तगडी रक्कम दिली. आम्ही थोडीच दिली नाशिककरांच्या टॅक्समधून दिली. त्याला पुढे काहीही उपयोग झाला नाही. खरं तर आमच्या मंडळींनी केला नाही. हुशार लोकांची आम्हाला किंमतच नाय. दिली होती की नाय हेरिटेज कमिटी नाशिककरांना. आता द्यावी लागली तर तशीच देऊ. पुन्हे एखाद्या संस्थेला लाखो रूपये देऊन रिपोर्ट तयार करून घेऊन आणि एखादी निवडणूक आली की सगळं विसरून जाऊ. नाशिककर ही वेडेच आहेत. महापालिका कुंभकर्ण आहे हे माहित असूनही कोणीच पाठपुरावा केला नाही. साहेबर काय दर तीन वर्षांनी बदलतात. प्रत्येकाला आपली इप्सित साध्य करायचं असतं आणि मोठं व्हायचं असतं. त्यांना काय करायचं आहे की आपण ज्या शहरातून मोठे झालो त्या शहराची स्थिती सुधारली का हे पाहण्याची गरज त्यांना वाटत नाही. इतके चांगले आयुक्त महापालिकेला मिळाले काही तरी बदल झाला का हो. मी झोपायचो आणि तगडे खायचो. माझ्या पोटाच्या आकारात काही बदल झाला का हो. उलट पोट वाढतच गेलं आणि शहरही आपल्या पद्धतीने वाढत गेलं नियम फक्त बदलायला असतात. कपाट बघा.. दंड भरून मोकळी होतील. आणि इतरांची कपाट भरतील. असं आय राव कलयुगात….!
रमेशायण : अरे, पण तु रामायणातील ना? काही तरी अर्थ आहे तुझ्या कामाला अन् रामायणाच्या महात्म्याला.. आपण आपल्या शहरासाठी काहीच का करायचं नाही?
कुंभकर्ण : भाऊ, रामायण, महाभारत मला माहित नाही. मी कुंभकर्ण आहे आणि मला सगळं शिस्तीत हवं आहे. शिस्तीत म्हणजे सोर्इसोर्इन बर का? म्हणजे गरिबांचं पाडा श्रीमंतांच झाकून ठेवा असं. आपण नियमानं चालतो. गरिबांला कोर्टात जाता येत नाय म्हणून पडतं श्रीमंत कोर्टात जातो म्हणून रहातं. तसचं तुमच्या हेरिटेज कमिटीचं हाय. यातून कोणाला टक्का मिळणार नाय. लष्कराच्या भाकर्या कशाला भाजायच्या फुकट! कपाट मोकळ करून जातो बघा जाता जाता.. लय मज्जा येर्इल. नाशिकच मला काय घेण देणं.. आणि तुमच्या हेरिटजेच्या आयचा घो. काय करणार तुम्ही. अभिनव भारत मंदिर महापालिकेनेच करावं का? तुम्ही नाशिककरांनी एकत्र येऊन ही वास्तू वाचवू शकत नाही का? कुठे आहे नाशिककरांचा आवाज.. हा आवाज नाय म्हणून तर आमचं फावतं.
रमेशायण : हेरिटेज कमिटी म्हणजे लष्कराच्या भाकर्या असतील तर असो. आम्हाला महापालिकेतील हरवलेलं हेरिटेज कमिटीचं आफिस आणून द्या. नाशिककरांचा आवाज नाही हे आहेच. पण, लढार्इ तर लढार्इ आहे ती मी लढणारच. कोणी बरोबर असू अथवा नसू. कोणीतील एकान सुरूवात केली म्हणजे हळूहळू पाठींबा उभा राहिलचं की. कुंभकर्ण असूनही तुम्ही नाही शहराचा आता इतका चांगला विचार केला का? ही तळमळ फक्त जागी ठेवा आपोआप बदल दिसू लागेल.
(चिडलेला कुंभकर्ण अखेर जागो सोडतो अन् हेरिटेजचं आफिस शोधायला निघतो. नियमात आहे हो पण नियम सोयी सोर्इन घ्यायचे म्हटलं म्हणजे आपलं हेरिटेज दुर्लक्षित राहणारच ना? कुंभकर्णाला ते सापडेल की नाही माहित नाही पण.. मी शोधणं थांबविणार नाही.. बर का!)

टिप्पण्या

  1. हेरिटेज कमिटी साठी वारंवार मागणी केली,मुख्यमंत्री यांना ही पत्र लिहीले मात्र अध्यापही महापालिकेतील कुंभकर्ण झोपेतून उठत नाही हे दुर्दैव..

    उत्तर द्याहटवा
  2. पुराणात बुडालेल्या ग्रंथ वर निघाल्याचे दाखले आहेत मात्र आपले स्मार्ट नाशिक च्या मोहात अडकलेले अधिकारी व नेते उपलब्ध असलेले ग्रंथ व पुरातन वस्तू बुडवून टाकतील

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नाशिकमध्येही हवं ‘मूर्तीचं वरकुटे’!

लकडी की काठी, काठी का घोडा!

काळाराम मंदिर सत्याग्रह : २ मार्च, काळाराम अन् रमेशायण!