गुरू नानकांची अयोध्येनंतर महाराष्ट्रवारी!
गुरू नानकांची अयोध्येनंतर महाराष्ट्रवारी! श्रीरामाशी निगडीत नाशिकसह महाराष्ट्रातील अनेक स्थळांना दिली होती भेट ramesh.padwal@timesgroup.com @rameshpadwalMT / 8380098107 नाशिक : शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांनी १५११ मध्ये रामजन्मभूमीला भेट दिल्यानंतर महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती, हिंगोली, नांदेड, पंढरपूर, रत्नागिरी, मुंबर्इ या ठिकाणांना १५१३ मध्ये भेटी दिल्या होत्या. आज गुरूनानक जयंतीनिमित्त व नुकत्याच लागलेला आयोध्या निकालामुळे हा ऐतिहासिक संदर्भ नाशिकसाठीही महत्त्वपूर्ण ठरतो आहे. सर्वोच्च न्यायालयाने आयोध्येतील राम जन्मभूमी वादावर निकाल देताना अनेक पुराण कथांबरोबर शीख ग्रंथांचा आधारही दिला आहे. गुरू नानक यांच्या जन्मसाखी (गुरू नानक चरित्र) ग्रंथानुसार त्यांनी १५११ मध्ये राम जन्मभूमीची यात्रा करीत मंदिरात रामाचे दर्शन घेतले होते. त्यावरून मुघल सम्राट बाबर याने १५२८ मध्ये बाबरी मशीद बांधली त्यापूर्वी आयोध्येत राम मंदिर अस्तित्वात होते हे सिद्ध झाले. जन्मसाखी बरोबरच वाल्मिकि रामायण आणि स्कंद पुराणाचाही आधार निकालासाठी घेण्यात आला आहे. हा संदर्भ अयोध्येपुरता...