गुलशन-ए-इश्क नासिक
गुलशन-ए-इश्क शीख साम्राज्याचे शेर-ए-पंजाब रणजीतसिंहांची राणी जिंद कौर पतीच्या निधनानंतर शीख साम्राज्य सावरण्याचा प्रयत्न करते. मात्र, सत्तेसाठी हपापलेले ब्रिटिश तिची तिच्या मुलापासून अन् साम्राज्यापासून ताटातूट करतात. एकीकडे व्हिक्टोरिया तिच्या मुलाचा सांभाळ करत असते, तर दुसरीकडे साम्राज्य आणि मुलं गमावल्याची दु:खाने जिंद नेपाळमध्ये एकांतवासात असते. शीख साम्राज्य, नेपाळ, लंडन, नाशिक आणि पुन्हा लाहोर असा जिंदच्या अनोखा प्रेमाचा प्रवास म्हणजे गुलशन-ए-इश्कचं म्हणावा… रमेश पडवळ ramesh.padwal@timesgroup.com दोन हजार वर्षांपूर्वी मोहाच्या फुलांनी गोदाकाठ दरवळून जायचा. ती फुलं पाण्यात टपटपायची तेव्हा प्रेमाचा संदेश घेऊन पुढच्या गावापर्यंत हा दरवळ बहरायचा अन् प्रत्येक थेंबा थेंबानं अंग शहारायचं! तेव्हा गालिब असते तर किती सुंदर लिहिलं असतं, असं वाटण्यापूर्वी दोन हजार वर्षांपूर्वीचा हाल नावाचा राजा तेव्हाचा एक गालिब म्हणावं इतका अनोखा कवी, गोदाकाठच्या मोहाच्या फुलांविषयी तेवढंच सुंदर वर्णन सप्तशती ग्रंथात नोंदवितो. अशा या नाशिकनं क...