राज्य संग्रहालयातून मांडणार वैभवशाली ‘महा’संस्कृती
राज्य संग्रहालयातून मांडणार वैभवशाली ‘महा’संस्कृती ramesh.padwal@timesgroup.com MTrameshpadwal / 8380098107 नाशिक : देशभरात पाचशेहून अधिक संग्रहालये आहेत. यात गोवा, आसाम, गुवाहाटी, बिहारसारख्या राज्यांची संस्कृती दाखविणारी राज्य संग्रहालये आतापर्यंत दिमाखात उभी राहिली आहेत. मात्र, महाराष्ट्राच्या स्थापनेला साठ वर्षे उलटूनही राज्याचे स्वतंत्र असे राज्य संग्रहालय नव्हते. आता मात्र राज्याचे स्वत:चे संग्रहालय मुंबईत उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबतचा प्रस्ताव सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सादर केला आहे. महाराष्ट्राच्या ‘महा’संस्कृतीची मांडणी करतानाच, राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या शक्तिस्थळांसह अश्मयुगापासून ते आधुनिक महाराष्ट्राचा प्रवास शिल्पांसह दृकश्राव्य माध्यमातून मांडला जाणार आहे. पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, इतिहास-संस्कृतीबरोबर समाजकारण, राजकारण, कलासंस्कृती समजून घेण्यासाठी संग्रहालये मार्गदर्शक ठरतात. त्यामुळेच महाराष्ट्रात विविध विषयांवरील दोनशेहून अधिक शासकीय तसेच खासगी संग्रहालये आहेत. मुंबर्इतील छत्रपती शिवाजी ...